याेग साधनेद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:06+5:302021-05-29T04:27:06+5:30
गडचिराेली : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अणुविद्युत विभाग, वुमन्स विंग्स आणि प्राेजेक्ट पवित्र, ऑर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगलाेर यांच्या संयुक्त विद्यमाने ...
गडचिराेली : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अणुविद्युत विभाग, वुमन्स विंग्स आणि प्राेजेक्ट पवित्र, ऑर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगलाेर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ‘याेग साधनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे’ हा विषय प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आला. दाेन दिवस महिलांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षक मंगला मदाभुशी यांनी याेग विद्या यावर सखाेल मार्गदर्शन केले. प्रा. अनघा बाेकारे यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. तसेच जीवनशैलीतील सुधारणा याबाबत माहिती दिली. पहिल्यादिवशी प्रशिक्षक निवेदिता नंदुरी, नीता सावंत, नीता गुप्ता, पुनम भांडेकर यांनी याेगासने, आहार, प्राणायाम, ध्यान यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. दुसऱ्यादिवशी प्रशिक्षक वैशाली मडे, डाॅ. शाेभा काबरा यांनी एकाग्रता, ध्यान तसेच राेगप्रतिकारक शक्ती, बुस्टर प्राणायाम याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी हाेण्यासाठी अथक परिश्रमाबराेबरच याेग, ध्यानसाधना, प्राणायामची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा.मीनाक्षी मानलवार यांनी केले. शिबिरात ब्रम्हपुरी येथील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी तसेच संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्या. दाेनदिवशीय ऑनलाईन शिबिरात एकूण २४० शिबिरार्थींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रा. कविता कश्यप यांनी मानले. यशस्वीतेसाठी कल्पना येनूरकर यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य डाॅ. अतुल बाेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.