पोलीस प्रणालीचे धडे
By admin | Published: January 5, 2017 01:38 AM2017-01-05T01:38:57+5:302017-01-05T01:38:57+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे, मदत केंद्र, उपपोलीस ठाण्यात रेझिंग डे सोमवारी साजरा करण्यात आला.
धानोरात रेझिंग डे : शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह दिली माहिती
धानोरा : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे, मदत केंद्र, उपपोलीस ठाण्यात रेझिंग डे सोमवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांच्या माहितीसह पोलीस प्रणालीशी अवगत करण्यात आले. धानोरा येथे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पोलिसांच्या विविध विभागाची माहिती घेत पोलीस प्रणाली जाणून घेतली.
धानोरा पोलीस ठाण्यात रायझिंग डे निमित्त शस्त्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत पोलीस विभागाकडे असलेल्या विविध प्रकारच्या बंदूका ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांना या बंदूकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, पीएसआय अमोल वाघमारे, अतुल नावले उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध शाळांचे ६०० च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
दैैनंदिन व्यवहार जाणले
धानोरा पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनातील विविध विभागाविषयी माहिती देण्यात आली. पोलीस विभागातील अत्याधुनिक सी. सी. टी. एन. एस व कॉन्फरन्स कॉल याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगण्यात आली. पोलिसिंग अंतर्गत पोलिसांच्या दैैनंदिन कामाकाजाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व अन्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध बाबींची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.