शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:29 AM2018-06-02T01:29:48+5:302018-06-02T01:29:48+5:30
देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथे कृषी विभाग, तालुका कृषी कार्यालय देसाईगंजच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा अंतर्गत समाज मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना धान व इतर पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन तंत्र समजावून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथे कृषी विभाग, तालुका कृषी कार्यालय देसाईगंजच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा अंतर्गत समाज मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना धान व इतर पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन तंत्र समजावून सांगण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळशीच्या सरपंच रेखा तोंडफोडे होत्या. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून कृषी आयुक्तालय पुणेचे उपसंचालक बाबतीबाले, तालुका कृषी अधिकारी ए.सी. धेडे, ग्रा.पं. सदस्य सुरेश नागरे, तंत्र अधिकारी एल.ए.कटरे, प्रभारी मंडळ अधिकारी वाय.पी.रणदिवे, कृषी सहायक एस.डी.कोहळे, के.बी.ठाकरे, वाय.एस.बोरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकºयांना धान्य बिज प्रक्रिया, कीटकनाशकाची फवारणी कशी करावी, फवारणीदरम्यान घ्यावयाची काळजी, माती परीक्षण व त्यांचे फायदे आदीबाबतची माहिती देण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.