शेतकऱ्यांनी घेतले खत, रोग व कीड व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:59+5:302021-07-27T04:37:59+5:30
खत, रोग व कीड व्यवस्थापन याेग्य करून उत्पन्न जास्त घेता येईल या विषयावर शेतकऱ्यांना सूत्र समजावून दिले. यावेळी कृषिदूत ...
खत, रोग व कीड व्यवस्थापन याेग्य करून उत्पन्न जास्त घेता येईल या विषयावर शेतकऱ्यांना सूत्र समजावून दिले. यावेळी कृषिदूत प्रणाेती मोहुर्ले हिला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. टी. सुरजे तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख के. डी. गहाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहायक प्रभारी भांडारकर, कृषी शास्त्र विषयतज्ज्ञ उषा गजभिये व आशिष वाढई यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकरी धनराज चौधरी, कविता जेंगठे, सुनीता कोटरंगे, भाग्यरथा मेश्राम, संगीता मेश्राम, मीनाक्षी जेंगठे, चिवी जेंगठे आदी महिला उपस्थित होत्या.
(बॉक्स)
पट्टा पद्धतीचे फायदे
पट्टा पद्धतीने धानाची रोवणी केल्यास पट्ट्याची ३० ते ४० सेमी मोकळी जागा सोडण्यात येत असल्याने सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचतो तसेच हवा खेळती राहत असल्याने तुडतुड्याच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो. मोकळ्या पट्ट्यातून पिकांचे निरीक्षण करणे, फवारणी करणे तसेच धान बीजोत्पादकांना भेसळ काढणे सहज शक्य होते. शेतकऱ्यांनी कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धान पिकाची पट्टा पद्धतीने रोवणी करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.