बाैद्धिक संपदा अधिकाराबाबत वेबिनारमध्ये धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:14+5:302021-09-16T04:45:14+5:30
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. के. सिंग होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रा. नितीन पडोळे व अन्य मान्यवर उपस्थित ...
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. के. सिंग होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रा. नितीन पडोळे व अन्य मान्यवर उपस्थित हाेते. प्रा. पडाेळे यांनी बौद्धिक संपदा म्हणजे काय, कोणकोणत्या बौद्धिक संपदांच्या अधिनियमांतर्गत पेटंट रजिस्टर्ड करता येते व त्यांचे फायदे आणि पेटंट्स कसे मिळवायचे. भारतात आजपर्यंत तयार झालेले पेटंट याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. दीपक नागापुरे यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय व वेबिनार आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. या वेबिनारमध्ये प्रा. गोपाल तोमर, प्रा. डॉ. रमेश सोनटक्के, प्रा. डॉ. अपर्णा मारगोनवार, प्रा. डॉ. प्रदीप कश्यप, प्रा. डॉ. सोनाली ढवस, प्रा. सुबोध साखरे, प्रा. महेश सिलमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. जया रोकडे, प्रा. राहुल आवारी, प्रा. कवींद्र साखरे, अरविंद थोटे, संदीप मानापुरे, रवींद्र झाडे, राकेश बोंगिरवार, शुभांगी डोंगरे, विजय खोब्रागडे, अविनाश जीवतोडे, उषाबाई माहूरपवार, रमेश वागदरकर, तसेच विद्यार्थी सहभागी झाले. सहभागींचे आभार डॉ. प्रकाश राठोड यांनी मानले.