हाेऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:03+5:302021-07-04T04:25:03+5:30
बाॅक्स या महिन्यातील विवाह मुहूर्त शुद्ध मुहूर्त १, २, ३, १३ जुलै गाैण विवाह मुहूर्त २२, २५, २६, २८, ...
बाॅक्स
या महिन्यातील विवाह मुहूर्त
शुद्ध मुहूर्त
१, २, ३, १३ जुलै
गाैण विवाह मुहूर्त
२२, २५, २६, २८, २९ जुलै
बाॅक्स
परवानगी आवश्यक
लग्न कार्यासाठी संबंधित तहसीलदार यांची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेण्यासाठी साधा अर्ज व लग्नाची पत्रिका आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर काही वेळातच किंवा दुसऱ्या दिवशी परवानगी देण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाने परवानगी घेणे आवश्यक आहे.
बाॅक्स
लग्नासाठी ५० नागरिकांची उपस्थिती
लग्नासाठी केवळ ५० नागरिक उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नात उपस्थित प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन हाेत नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते.
काेट
वधू-वर पित्यांची कसरत
माेठ्या थाटामाटात लग्न पार पाडण्याची सवय लागली हाेती. लग्नासाठी नातेवाईक, मित्र परिवार यांना बाेलाविले जात हाेते. त्यामुळे किमान एक हजार व्यक्ती सहज उपस्थित राहत हाेते. मात्र काेराेनामुळे केवळ ५० नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५० नातेवाईकांची यादी जूळविताना वधू व वर पित्याची दमछाक हाेत आहे.