ओबीसींच्या प्रश्नांचा पाठपुरावा करू
By admin | Published: December 27, 2015 01:46 AM2015-12-27T01:46:52+5:302015-12-27T01:46:52+5:30
जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघटनेच्या वतीने २३ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
खासदारांचे आश्वासन : संघटनेच्या उपोषणाला भेट
गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघटनेच्या वतीने २३ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला खा. अशोक नेते व आ. डॉ. देवराव होळी यांनी २६ डिसेंबर रोजी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान ओबीसींचे प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे लावून धरू, असे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य रमेश भुरसे, प्रकाश अर्जुनवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भिवापुरे आदी उपस्थित होते. ओबीसी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वामण राऊत, रमेश मडावी, प्रभाकर मधुरे, केशवराव सामृतवार, जिल्हा संघटक डॉ. गुरूदास सेमस्कर, तालुका प्रमुख चोखाजी बांबोळे, विद्यार्थी संघटनेचे प्रशांत दोनाडकर, मुकूल मडावी, राकेश गेडाम, गुरूदेव भोपये, प्रफुल्ल म्हशाखेत्री, विलास देशमुख, मिलिंद बारसागडे, हरीश वाकडे, म्हशाखेत्री, अशोक साखरे, केशव म्हशाखेत्री आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्हा वास्तव्यास असलेल्या ओबीसींविरोधात शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय न बदलल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना दिला. (नगर प्रतिनिधी)