छल्लेवाडात ‘चला मैत्री करू या उपक्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:49+5:302021-03-19T04:35:49+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, छल्लेवाडा ही शाळा दुर्गम भागात असूनही विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडत ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, छल्लेवाडा ही शाळा दुर्गम भागात असूनही विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडत असते. नेहमी तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय ऑनलाइन उपक्रमात सहभागी होते, तसेच शाळेबाहेरची शाळा या आकाशवाणी केंद्र, नागपूरने विद्यार्थिनीशी साधलेला संवाद उत्कृष्ट होता. यात रक्षा गुरनुले, स्नेहा धरावत, कीर्ती ओशाके, श्रीनिवास चव्हाण, केतन निकोडे आदी विद्यार्थ्यांनी संवाद साधला व शैक्षणिक मैत्री केली. उपक्रमशील शिक्षक सूरजलाल येलमुले, कल्पना रागीवार, पदवीधर शिक्षिका, समय्या चौधरी, सामा सिडाम, मुख्याध्यापक, बाबूराव कोडापे, राजेंद्र दहिफळे, मुसली जुमडे व केंद्रप्रमुख सुनील आइंचवार, तसेच आसरअली शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख, श्रीनिवास रंगू, सुरेश चुधरी, महेंद्र वैद्य, विजय कलकोटवार, प्रतिभा बंडगर यांचे या उपक्रमांसाठी मार्गदर्शन लाभले.