क्रमिक ज्ञानासोबतच भावी पिढ्यांना जीवनशिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:42 AM2021-09-12T04:42:26+5:302021-09-12T04:42:26+5:30

आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवारी शिक्षक दिन कार्यक्रम घेण्यात आला. ...

Life education should be imparted to future generations along with gradual knowledge | क्रमिक ज्ञानासोबतच भावी पिढ्यांना जीवनशिक्षण द्यावे

क्रमिक ज्ञानासोबतच भावी पिढ्यांना जीवनशिक्षण द्यावे

Next

आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवारी शिक्षक दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला अजय खंडारे, प्रफुल्ल श्रीरामे, विद्या राऊत, आशिष बाहेकर, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, आयक्यूएसीप्रमुख प्रा. नोमेश मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांचा शाल व श्रीफळ देऊन आणि प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. नोमेश मेश्राम, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. विजय रैवतकर, तर आभार प्रा. डॉ. गजेंद्र कढव यांनी मानले.

Web Title: Life education should be imparted to future generations along with gradual knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.