झिमेलावासीयांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:31 PM2020-08-27T23:31:18+5:302020-08-27T23:33:12+5:30

अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.

The life is hard of Jimela village | झिमेलावासीयांची वाट बिकट

झिमेलावासीयांची वाट बिकट

Next
ठळक मुद्देपावसाने रपटा वाहून गेला : प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तरेकडे चार किमी अंतरावर असलेल्या झिमेला गावाला जाणाऱ्या मार्गावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण केला नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात झिमेला गावातील नागरिकांसमोर आवागमनाची मोठी समस्या निर्माण होते.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.
झिमेला गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होते. औषधोपचारासाठी तालुकास्ळी अहेरीला जाण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण निर्माण होते. याच मार्गाने कर्मचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस व पुलाच्या अभावामुळे या भागातील दळणवळण व्यवस विस्कळीत झाली आहे. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने झिमेला गावाकडे जाणारा रस्ता व पुलाचे काम केले नाही.
पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महामंत्री संतोष गणपूरवार, जयसेवा समितीचे सल्लागार मोनिष पेंदाम, झिमेला येीेल धर्मराव पोरतेट, भगवान सिडाम, विनोद तोरेम, सुरेश पोरतेट, तिरूपती सडमेक यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे.
डांबरीकरणाचा पत्ता नाही
तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झिमेला गावाकडे जाणाऱ्या व मुख्य मार्गाला जोडणाºया रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर एकूण तीन ठिकाणी रपट्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र सर्वात मोठा रपटा झिमेला गावाजवळच्या नाल्यावर आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रपट्यावर पाणी चढत असते. यावर्षीच्या पावसाने सदर रपटा पूर्णत: वाहून गेला. या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The life is hard of Jimela village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.