प्रेयसीला विहिरीत ढकलून मारणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:36+5:302021-04-08T04:37:36+5:30

गडचिराेली : शेतात भेटण्यासाठी बाेलावल्यानंतर झालेल्या वादात प्रेयसीला मारहाण करून विहिरीत ढकलून मारणाऱ्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम. ...

Life imprisonment for a lover who pushes his beloved into a well | प्रेयसीला विहिरीत ढकलून मारणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

प्रेयसीला विहिरीत ढकलून मारणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

Next

गडचिराेली : शेतात भेटण्यासाठी बाेलावल्यानंतर झालेल्या वादात प्रेयसीला मारहाण करून विहिरीत ढकलून मारणाऱ्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम. पाटील यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. हा निकाल बुधवारी (दि.७) दिला. जयदेव निरंजन सरदार (२२) रा.काेपरअल्ली, ता.मुलचेरा असे आराेपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार ११ जून २०२० राेजी आराेपी जयदेव आणि त्याचा मित्र हे दाेघेही आपापल्या प्रेयसींना भेटण्यासाठी दुचाकीने पुल्लीगुडम, चंदनवेली येथे गेले हाेते. त्यांनी फाेनवरून दाेघींनाही शेतात बाेलाविले. त्यानंतर जयदेवचा मित्र व त्याची प्रेयसी शेतातील झाेपडीत थांबले. तर आराेपी जयदेव आणि त्याची प्रेयसी लगतच्या जंगलात निघून गेले. इकडे दाेन ते अडीच तास थांबल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. जयदेवने प्रेयसीला मारहाण करत त्याचा मित्र थांबून असलेल्या ठिकाणी आणले. तेथे पुन्हा तिला मारहाण करून शेतातील विहिरीच्या काठावर नेऊन तिला विहिरीत ढकलून दिले.

यावेळी जयदेवने त्याचा मित्र व त्याची प्रेयसी यांना तिला न वाचविण्याची तंबी दिली. तसेच या घटनेबद्दल कुणाला काही सांगितल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे जयदेवची प्रेयसी पाण्यात बुडून मरण पावली. परंतु जयदेवचा मित्र व त्याच्या प्रेयसीने कुणालाही या घटनेबद्दल सांगितले नाही.

दरम्यान मृत युवतीचे वडील दुसऱ्या दिवशी काेपरअल्ली येथे जात असताना शेतातील त्या विहिरीजवळ त्यांना आपल्या मुलीची चप्पल आणि हातातील कडे दिसले. परंतु विहिरीत काहीही दिसलेे नाही. त्यांनी आराेपीच्या मित्राकडे वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनी झालेली घटना सांगितली.

याप्रकरणी एटापल्ली पाेलिसांनी आराेपी जयदेव सरदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्या.व्ही.एम. पाटील यांनी सबळ पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून आराेपी जयदेव सरदार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिल प्रधान यांनी बाजू मांडली. काेर्ट पैरवी पाे.उपनिरीक्षक श्याम गव्हाणे आणि नारायण बच्चलवार यांनी केली.

Web Title: Life imprisonment for a lover who pushes his beloved into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.