चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:34 AM2021-02-12T04:34:45+5:302021-02-12T04:34:45+5:30
पत्नी संध्या हिच्याबद्दल उद्धव याच्या मनात संशयाने घर केले होते. यादरम्यान ७ जानेवारी २०२० राेजी रात्री ती घरातील खाटेवर ...
पत्नी संध्या हिच्याबद्दल उद्धव याच्या मनात संशयाने घर केले होते. यादरम्यान ७ जानेवारी २०२० राेजी रात्री ती घरातील खाटेवर झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास उद्धवने कुऱ्हाडीने तिच्यावर सपासप वार केले. कपाळावर व छातीवर गंभीर जखमा झाल्याने संध्या यांना उपचारासाठी आरमोरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संध्या यांचा मृत्यू झाला.
आरमाेरी पाेलिसांनी आराेपी उद्धव भांडेकर याच्याविराेधात भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पाेलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी तपास पूर्ण केला व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. आराेपीविरुद्धचे सबळ पुरावे व साक्षीदारांचे बयाण आणि सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी उद्धव भांडेकर याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियाेक्ता एन. एम. भांडेकर यांनी काम पाहिले.