आयटीआयमध्ये जीवन काैशल्य कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:09+5:302021-02-11T04:38:09+5:30
देसाईगंज : आरोग्य प्रबोधिनी संस्था व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी वयात येताना होणाऱ्या बदलांबाबत ...
देसाईगंज : आरोग्य प्रबोधिनी संस्था व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी वयात येताना होणाऱ्या बदलांबाबत व शरीरशास्रसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास आडे होते. मार्गदर्शक म्हणून आरोग्य प्रबोधिनीच्या डॉ. अर्चना गभने व आरती पुराम उपस्थित होत्या. डॉ. गभने यांनी स्री शरीर विज्ञान, मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छता व काळजी, पाळीसंबंधी तक्रारी, नैसर्गिक लिंगभेद, मासिक पाळी म्हणजे काय, आहार व पोषण, विविध खाद्यपदार्थ व त्याची शरीरासाठी उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. प्रास्ताविकेतून आर.एम.गोटमारे यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.बी. वासनिक तर आभार आर. के. लोही यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम.एस.जाधव, एम.एम. वल्के, आर.एस. सोनेकर, व्ही.वाय. नागमोती, सी. आर. कावले, ए. डब्लू. खोब्रागडे, जी.जे. ठाकरे, आर.बी. भोयर, ए.टी. करांकार, एम.के.वल्के, एस.पी. मेश्राम, डी.सी. बोलके यांनी सहकार्य केले.