जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 06:00 AM2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:36+5:30

सिरोंचा ते रेगुंठा ही बस मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र काही कारणांमुळे एसटी महामंडळाने सदर बससेवा मागील दीड वर्षांपासून बंद केली आहे. रेगुंठा परिसरात पारसेवाडा, मोयाबीनपेठा, नरसिंहापल्ली, कोटापल्ली, चिक्क्याला, मुलदिम्या, बोकाठागुडम, दरशेवाड, झेंडा आदी गावांचा समावेश होतो.

Life-threatening journey | जीव धोक्यात घालून प्रवास

जीव धोक्यात घालून प्रवास

Next
ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील स्थिती : रेगुंठा बस बंद केल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा परिसरात जाणारी बसफेरी बंद केल्याने या परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांची अडचण वाढली आहे. खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे मालवाहू वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून प्रवास केला जात आहे.
सिरोंचा येथे महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये तसेच आठवडी बाजार भरते. तालुक्यातील सर्वात मोठे गाव सिरोंचा असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील शेकडो नागरिक सिरोंचा येथे येतात. रेगुंठा परिसरातही अनेक गावे आहेत. सिरोंचा ते रेगुंठा ही बस मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र काही कारणांमुळे एसटी महामंडळाने सदर बससेवा मागील दीड वर्षांपासून बंद केली आहे. रेगुंठा परिसरात पारसेवाडा, मोयाबीनपेठा, नरसिंहापल्ली, कोटापल्ली, चिक्क्याला, मुलदिम्या, बोकाठागुडम, दरशेवाड, झेंडा आदी गावांचा समावेश होतो.
या गावांमधील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षणासाठी येत होते. मात्र बस बंद केल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे. या परिसरात प्रवाशी वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे मालवाहू वाहनामध्ये बसून प्रवास केला जात आहे. विशेष म्हणजे मालवाहू वाहनामध्ये बसून सुद्धा त्यांना बस एवढीच तिकीट द्यावी लागत आहे.

मालवाहू वाहनाने प्रवाशी वाहतूक
मालवाहू वाहनाच्या टप्परवर प्रवाशी बसविले जात आहे. टप्परवर बसून प्रवास करणे अतिशय धोक्याचे आहे. एखाद्या खड्ड्यात वाहन गेल्यास वाहनाला बसणाऱ्या जोरदार धक्क्याने टप्परवर बसलले प्रवाशी खाली कोसळण्याचा धोका आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टप्परवर बसून प्रवास केला जात असला तरी याला अटकाव करणारा अधिकारी नाही त्यामुळे खुलेआम अशी धोकादायक वाहतूक केली जात आहे. एसटीने बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.

Web Title: Life-threatening journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.