वीज प्रवाहाच्या झटक्याने लाईनमनचा जागीच मृत्यू, दुरूस्ती करताना डिपीवरून खाली काेसळला
By दिलीप दहेलकर | Published: February 5, 2024 01:40 PM2024-02-05T13:40:14+5:302024-02-05T13:40:29+5:30
Gadchiroli: वीज ग्राहकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वीज राेहित्रावर चढून विज पुरवठयाची दुरूस्ती करताना वीज प्रवाहाचा झटका लागल्याने खाली काेसळून लाईनमनचा जागीच मृत्यू झाला.
- दिलीप दहेलकर
गडचिराेली - वीज ग्राहकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वीज राेहित्रावर चढून विज पुरवठयाची दुरूस्ती करताना वीज प्रवाहाचा झटका लागल्याने खाली काेसळून लाईनमनचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ४ फेब्रुवारी राेजी रविवारला सकाळी ११. १० वाजताच्या सूमारास येथील चामाेर्शी मार्गावरील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेच्या जवळ घडली. जितेंद्र गज्ज्लवार (४१) रा. भातगिरणी परीसर सर्वादय वार्ड गडचिराेली असे मृतक लाईनमनचे नाव आहे.
गज्जलवार हे महावितरणच्या गडचिराेली शहर शाखेत लाईनमन पदावर नियमित कर्मचारी म्हणून कार्यरत हाेते. त्यांचे मुळ गाव चंद्रपूर जिल्हयाच्या सावली तालुक्यातील बाेरमाळा हे आहे. महावितरणच्या शहर शाखेत प्राप्त झालेल्या विज ग्राहकांच्या तक्रारीनूसार विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जितेंद्र गज्ज्लवार हे चामाेर्शी मार्गावर सकाळी आले. दरम्यान जि. प. शाळेच्या परीसरातील वीज राेहित्रावर चढून विज सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यापुर्वी त्यांनी डिपीवरील राळ बंद केल्याने संपुर्ण ट्रान्सफार्मर वरील विज पुरवठा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र काही वेळातच वीज प्रवाहारच्या तीव्र झटक्याने गज्जलवार हे खाली काेसळले. दरम्यान त्यांच्या डाेक्याला जखम हाेवून खाली रक्त सांडले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान यावेळी त्यांचा हात व कपडे जळाले. नागरीकांकडून घटनेची माहीती मिळताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. गडचिराेली पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला.
कुटुंबीयांनी फाेडला हंबरडा
कर्तव्य बजावताना पतीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी कळताच पत्नीसह त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फाेडला. जिल्हा सामान्य रूग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी प्रचंड आक्रेश केला.