लिंक फेलचा बँक ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:27 AM2019-08-21T00:27:30+5:302019-08-21T00:28:07+5:30
येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पैसे बँकेत जमा होतात. पैसे जमा झाल्याने नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सकाळपासूनच लिंक फेल होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले होते. तालुक्यातील मिचगाव, चिचोली, जपतलाई, गुंलाजलगोंदी, दुधमाळा, इरूपधोडरी, ग्यारापत्ती, पन्नेमारा आदी गावातून नागरिक आले होते. व्यवहार ठप्प पडल्याने बँके कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना बँकेच्या बाहेर थांबून प्रतीक्षा करावी लागली. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.