अडीच लाखांचा सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:50+5:30
विष्णूपूर जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना झाली. त्यानुसार जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणची तपासणी केली असता, ४५ ड्रम जमिनीत गाडून ठेवल्याचे आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ५० हजार रूपये एवढी होते. गाडलेला मोहफूल सडवा बाहेर काढून तो नष्ट केला. संपूर्ण आरोपी फरार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शीपासून १३ किमी अंतरावर असलेल्या विष्णूपूर जंगल परिसरात धाड टाकून २ लाख ५० हजार रूपये किमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. १३ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विष्णूपूर जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना झाली. त्यानुसार जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणची तपासणी केली असता, ४५ ड्रम जमिनीत गाडून ठेवल्याचे आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ५० हजार रूपये एवढी होते. गाडलेला मोहफूल सडवा बाहेर काढून तो नष्ट केला. संपूर्ण आरोपी फरार झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये अविनाश बिश्वास, सुखदेव बिश्वास, साधन गुडिया, भजन गुडिया, पुष्पजीत मंडल, नारायण मंडल, अजित बिश्वास, लखन बिश्वास, प्रणय सरदार, समय वाढई, श्याम हलदर, सूरजो हलदर, सुकेन सखहारी सर्व रा. विष्णूपूर यांचा समावेश आहे. ही कारवाई ठाणेदार जितेंद्र बोरकर, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, पोलीस हवालदार राजू उराडे, नजीर पठाण, संजय चक्कावार, जीवन हेडाऊ, सूमित गायकवाड, रजनीकांत पिल्लेवान, धनराज पिटाले, संदीप भिवनकर, विलास गुंडे, रमाकांत शिंदे, राहूल पारेल्लीवार यांनी केली.
मोहफुलाच्या दारूची मागणी वाढली
लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी पोलीस विभागाचे नाके आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनाने देशी, विदेशी दारू आणणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दारू शौकीन आता मोहफुलाच्या दारूकडे वळले आहेत. या दारूची मागणी वाढली आहे.