राजाराम परिसरात दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:46 AM2019-09-02T00:46:46+5:302019-09-02T00:47:40+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असतानाही अहेरी उपविभागात चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची आयात होत आहे. याशिवाय मोहफुल व गुळाची दारूही सहज उपलब्ध होत आहे. राजाराम, रायगट्टा, कोंकापल्ली, खांदला, मरनेली, पत्तीगाव, नंदिगाव, झिमेला, गुड्डीगुडम या आदी गावामध्ये देशी-विदेशी दारूची आयात होत आहे.

Liquor in the Rajaram area | राजाराम परिसरात दारूचा महापूर

राजाराम परिसरात दारूचा महापूर

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे उपपोलीस स्टेशन असून राजाराम गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असतानाही अहेरी उपविभागात चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची आयात होत आहे. याशिवाय मोहफुल व गुळाची दारूही सहज उपलब्ध होत आहे. राजाराम, रायगट्टा, कोंकापल्ली, खांदला, मरनेली, पत्तीगाव, नंदिगाव, झिमेला, गुड्डीगुडम या आदी गावामध्ये देशी-विदेशी दारूची आयात होत आहे. या गावांमध्ये दारू विक्रेते जास्त प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे. आश्रम शाळेच्या काही अंतरावरच देशी-विदेशी, मोहफुल, गुळाची अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. राजाराम पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष होत असल्याने दारू विक्रेते याचा फायदा घेत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोळा सणादरम्यान गावागावात दारूचे पाट वाहत होते.
कोंबड बाजारावर चालतो जुगार
ग्रामीण भागात खरीप हंगाम (धानपीक हंगाम) आटोपला की साधारणत पोळा सणानंतर काही ठिकाणी कोंबड बाजार भरविला जातो. पण राजाराम परिसरातील काही गावांमध्ये वर्षभर चोरट्या मार्गाने कोंबडा बाजार भरवला जात असून यात हजारो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. मागील काही दिवसांपासून झिमेला येथे दररविवारी कोंबड बाजार चोरट्या मार्गाने भरविला जातो. यात सुशिक्षित तरुणांचाही सहभाग मोठा असतो. या भागातील अनेक सुशिक्षीत युवक दारू, कोंबड बाजार व इतर अवैध धंद्याच्या नादी लागले आहेत. एकूणच सामाजिक सलोखा धोक्यात आहे.

Web Title: Liquor in the Rajaram area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.