चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:50 PM2017-11-16T23:50:13+5:302017-11-16T23:50:34+5:30

स्थानिक गुन्हे शाखा पथक व कुरखेडा चामोर्शी व गोठणगाव येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करून जवळपास दीड लाखांची किंमतीची दारू जप्त केली.

Liquor seized in Chamorshi and Gothganaga | चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त

चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त

Next
ठळक मुद्देवाहने घेतली ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/कुरखेडा : स्थानिक गुन्हे शाखा पथक व कुरखेडा चामोर्शी व गोठणगाव येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करून जवळपास दीड लाखांची किंमतीची दारू जप्त केली.
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात गोठणगावजवळ पाळत ठेवून देशी व विदेशी दारूच्या पेट्या वाहनातून उतरविताना धाड टाकण्यात आली. घटनास्थळावरून देशी दारूच्या ८३२ निपा जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत ४९ हजार ९२० रूपये होते. तसेच विदेशी कंपणीच्या २२९ निपा आढळल्या. त्याची किंमत ६० हजार २०० रूपये एवढी होते. याप्रकरणी प्रणय प्रकाश पित्तुलवार (२३) रा. मालेवाडा याला अटक करण्यात आली आहे. त्याचे वाहन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार योगेश घारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ हिडामी, पोलीस हवालदार केवळराम पांडे, रामचंद्र सिंद्राम, कृष्णा सहारे, दोनाडकर, पवार यांनी केली.
कुरखेडा तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे तालुक्यातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
चामोर्शी येथून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, भाऊराव बोरकर, प्रेमकुमार दुर्गे, प्रदीप चवरे यांनी चामोर्शी येथे धाड टाकून एमएच-३१-सीआर-९५०१ क्रमांकाच्या कारची झडती घेतली असता, कारमध्ये ५१ हजार ५०० रूपये किंमतीच्या १ हजार ३० दारूच्या बॉटल आढळून आल्या. दारूसह ज्या कारमधून दारूची वाहतूक केली जात होती, ती कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे. कारची किंमत ३ लाख ७५ हजार रूपये एवढी आहे. याप्रकरणी कुरूड येथील चंद्रय्या गड्डमवार व देवडी येथील श्रीकांत बोईनवाड या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Liquor seized in Chamorshi and Gothganaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा