अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:30 AM2017-10-15T01:30:51+5:302017-10-15T01:31:01+5:30

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.

Literature of Saints is important in early literature | अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण

Next
ठळक मुद्देसंमेलनातील परिसंवाद : राजन जयस्वाल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.
राष्टÑसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने गुरूदेव प्राथमिक शाळेत आयोजित राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनादरम्यान झालेल्या परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर वक्ते म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, प्रा. सविता सादमवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. चौथाले यांनी राष्ट्रसंतांच्या गद्य वाङ्मयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. राष्टÑसंतांनी स्वत:ला ओळखणे म्हणजे आत्मसाक्षात्कार असून कर्मकांडाने कोणताही देव प्रसन्न होत नाही. कर्मातच ईश्वर आहे, असे सांगितले. प्राचार्य सादमवार यांनी राष्टÑसंतांची भजने यावर विचार व्यक्त केले. सद्विचार, सद्भावना, सद्धर्म राष्टÑसंतांच्या अभंगातून व्यक्त होतो. विश्वधर्म, विश्वबंधुत्वाचे विचार राष्टÑसंतांनी आपल्या अभंगातून समाजाला दिले, असे सादमवार यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाचे संचालन डॉ. राजकुमार मुसने यांनी केले तर आभार प्रा. श्रावण बानासुरे यांनी मानले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर, ना.गो.थुटे, हिरामण लंजे, डॉ. परशुराम खुणे, अ‍ॅड. जेनेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Literature of Saints is important in early literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.