पावसामुळे रोवलेल्या धानाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:30 AM2018-08-12T00:30:32+5:302018-08-12T00:31:14+5:30
१५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अगदी वेळेवर व समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने जवळपास १५ ते २० दिवस उसंत घेतली. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी आटले. त्यामुळे रोवणीची कामे बंद पडली. त्याचबरोबर रोवलेल्या धानाच्या बांधितही पाण्याअभावी फटी पडू लागल्या व धानाचे पीक करपायला लागले होते. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. यावर्षी सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा शक्यता वर्तविली जात होती. मात्र शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दिवसभर पाऊस पडत होता. या पावसामुळे करपणाºया धान पिकाला दिलासा मिळाला आहे.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनपर्यंत खोळंबलेली रोवणीची कामे मात्र सुरू झाली नाही. रोवणी पुन्हा सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. धान पिकाची रोवणी जेवढी उशीरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजुनही जवळपास ३० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
४० हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविना
पावसाने उसंत घेतल्याने जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर अजुनही धान पिकाची रोवणी झाली नाही. हे शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची रिपझीप सुरू होती. मात्र अशा पावसामुळे धानाच्या बांधीत रोवण्यायोग्य पाणी साचत नाही. रोवणे सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. धानाचे पºहे टाकल्याला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. उशीरा रोवणी झाल्याने उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.
पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.