पशुधनावर आधारित मिळणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:09+5:302021-06-18T04:26:09+5:30

प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, गाय व कोंबड्यांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक ...

Livestock based training | पशुधनावर आधारित मिळणार प्रशिक्षण

पशुधनावर आधारित मिळणार प्रशिक्षण

Next

प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, गाय व कोंबड्यांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन,

औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्त्वाचे महत्व,

संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, यशस्वी उद्योजक

यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी

विषयावर विशेष तज्ज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक/ युवतींनी त्वरित दि. २७ जूनपर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, छावणी एरीया, गडचिरोली येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन हजर रहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड, कार्यक्रम आयोजक वनश्री रामटेके किंवा

०७१७२-२७४४१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: Livestock based training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.