जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:39 PM2018-11-03T23:39:44+5:302018-11-03T23:40:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ होत असून विविध तंत्रज्ञानाचा वापर ...

Loan for the cultivation of bamboo by the district bank | जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज

जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज

Next
ठळक मुद्देमोबाईल बँकिंग सुविधा : तंत्रज्ञानाच्या वापरात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ होत असून विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या बँकेकडून आता जिल्ह्यातील शेतकºयांना धानाला पर्याय म्हणून बांबू लागवडीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली.
बँकेच्या सभागृहात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी बँकेच्या विविध ग्राहकोपयोगी सुविधांची माहिती देण्यासोबतच आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर आणखी कसा वाढविला जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर, उपव्यवस्थापक हर्षवर्धन भडके उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून आतापर्यंत १८ हजार रोपांचे वाटपही झाले असल्याचे पोरेड्डीवार यांनी सांगितले. बँकेच्या स्थापनेला ३३ वर्षे झाली. त्यावेळी ७ कोटीवर सुरू झालेल्या बँकेची उलाढाल आता २ हजार कोटींवर पोहोचली. येत्या ३१ मार्चपर्यंत ही बँक २५०० कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास यावेळी सीईओ सतीश आयलवार यांनी व्यक्त केला. याशिवाय इंटरनेट बँकींगची सुविधा येत्या वर्षभरात मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
भविष्यात इथेनॉलचा प्रकल्प
पेट्रोलला पर्याय ठरणार असलेल्या इथेनॉलची बांबूपासून निर्मिती होऊ शकते. त्यामुळे बांबूची मागणी वाढणार आहे. त्यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँकेचे मार्गदर्शक अरविंद सा.पोरेड्डीवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळेच शेतकºयांना बांबूसाठी कर्ज देण्यासोबतच महाराष्ट्र वनविकास महामंडळामार्फत बांबूची रोपेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशा स्थितीत भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्प लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रंचित पोरेड्डीवार यांनी सांगितले.

Web Title: Loan for the cultivation of bamboo by the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.