फुले महामंडळामार्फत कर्ज याेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:23+5:302021-06-25T04:26:23+5:30

देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेची माहिती आणि अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. तपशील/प्रकल्प मूल्य यामध्ये रुपये एक लाख ...

Loan scheme through Phule Corporation | फुले महामंडळामार्फत कर्ज याेजना

फुले महामंडळामार्फत कर्ज याेजना

Next

देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेची माहिती आणि अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

तपशील/प्रकल्प मूल्य यामध्ये रुपये एक लाख ते पाच लाखापर्यंत आहे. यात एनएसएफडीसीचा सहभाग

हा ८० टक्के आहे. भांडवल अनुदान २० टक्के असेल. तसेच व्याजदर हा ६ टक्के असून, परतफेडीचा

कालावधी हा ६ वर्षे असेल. अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये ३ लाखांपर्यंत

असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा, मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी, मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता मृत्यू प्रमाणपत्र,

स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास

अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आह,. असे महामंडळाचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Web Title: Loan scheme through Phule Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.