दुर्गम गावात जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:40 PM2017-12-30T23:40:52+5:302017-12-30T23:41:03+5:30

जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.

Locality in the remote village | दुर्गम गावात जनजागरण

दुर्गम गावात जनजागरण

Next
ठळक मुद्देदेवसूर येथे मेळावा : पोलीस प्रशासन व सीआरपीएफतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ बटालियनचे अस्टिटंड कमांडंट रोहताश होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. आर.आर. बन्सोडे, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ कुडवे, पीएसआय अडागडे, बारंगे, सरपंच पुडो उपस्थित होत्या. जनजागरण मेळाव्याच्या निमित्ताने कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेसह सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पोलीस मदत केंद्र ग्यारापत्तीच्या वतीने गरजू नागरिकांना साडी व अन्य साहित्याचे वाटपही करण्यात आले. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
अधिकारी अनुपस्थित
पोलीस मदत केंद्र ग्यारापत्तीच्या वतीने देवसूर येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. परंतु आरोग्य, विद्युत व आदिवासी प्रकल्प विभाग वगळता अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यक्रमाला पाठ दाखविली. त्यामुळे नागरिकांना महसूलसह पं.स. तील योजनांची माहिती मिळाली नाही.

Web Title: Locality in the remote village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.