ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:51 AM2018-07-07T00:51:49+5:302018-07-07T00:52:38+5:30

भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे.

The locals locked the school | ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

googlenewsNext
ठळक मुद्देलाहेरीत शिक्षक देण्याची मागणी : सात वर्गासाठी केवळ दोनच वर्गखोल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने शिक्षक व वर्गखोल्यांची व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी लाहेरी जि.प. शाळेला शुक्रवारी कुलूप ठोकले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने २७ जून २०१८ रोजी भामरागडच्या बीडीओंना लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती. वर्गखोल्यांची व्यवस्था करावी, धूळखात पडलेल्या संगणक संचाची दुरूस्ती करावी, डिजिटल शाळेसाठी पुरविण्यात आलेल्या एलईडी टीव्हीचा वापर करण्यात यावा, मागील सात वर्षांपासून रिक्त असलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागण्या मंजूर न झाल्याने शाळा समितीचे सभापती सुरेश सिडाम यांच्या नेतृत्वात लाहेरी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.
शाळेच्या समस्यांना घेऊन कुलूप ठोकण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना ४ जुलैला निवेदन दिले होते. ५ जुलैपर्यंत प्रशासनाने शिक्षक व शाळेच्या इतर मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा ६ जुलैला कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनातून दिला होता. आंदोलनाच्या वेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Web Title: The locals locked the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.