पोर्लावासीयांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:27 AM2018-09-26T01:27:19+5:302018-09-26T01:27:52+5:30
एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.
रविवारी सायंकाळच्या सुमारास प्रिया सूरज गेडाम या गरोदर मातेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु आरोग्य केंद्र कुलूप बंद होते. गरोदर माता व तिचा पती आरोग्य केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत बसले होते. याबाबतची माहिती नागरिकांना मिळाली. त्यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन कुलूप ठोकले. याची माहिती सरपंच कविता फरांडे, उपसरपंच नरेंद्र मामिडवार, सदस्य होमराज उपसो, रवींद्र सेलोटे, रेखा डवरे, पुष्पा भोयर, कविता चुधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शालिक भोयर यांना देण्यात आली. त्यांनी आरोग्य केंद्र गाठले व या प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांना देण्यात आली. डॉ.शंभरकर यांनी तत्काळ पोर्ला गाव गाठून गावकºयांची समजून काढली. आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोग्य केंद्राचे कुलूप उघडण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी मनोज बिटपल्लीवार, आरोग्य सेविका सहारे यांना रात्रपाळीसाठी नियुक्त करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिक रमेश फरांडे, तुलाराम डवरे, पांडुरंग भोयर, किमदेव उपासे, अमित उपासे, दिलीप शिवणकर, अशोक बेहरे, लोमेश कलसार, पुनीत उपासे, सोमेश्वर अम्मावार, महेश राऊत, मनोज गेडाम, अनिल गेडाम व ग्रामस्थ उपस्थित होते.