येमली शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:35 PM2017-09-23T21:35:58+5:302017-09-23T21:37:43+5:30
एटापल्ली तालुक्यातील येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात दोनदा पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात दोनदा पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती. परंतु मुख्याध्यापकाची चौैकशी करण्यात आली नाही. तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले.
येमली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात ४ आॅक्टोबर २०१६ व ७ सप्टेंबर २०१७ ला पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती. परंतु मुख्याध्यापकांची कुठलीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. नागरिकांनी प्रथम पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाºयांना शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजेच शनिवारी गटशिक्षणाधिकारी, बुर्गीचे केंद्रप्रमुख यांच्या समक्ष ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अधिकाºयांच्या भूमिकेबद्दलही तीव्र रोष व्यक्त केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव हिचामी, उपाध्यक्ष जगपती गावडे, सदस्य रामजी कत्तीराव, रामा तुमरेडी, पुनेश्वर खोब्रागडे, सुधाकर दुर्गे, सावजी मडावी, दौलत गावडे, चंदू मडावी, घासी मडावी, वच्छला आत्राम, सुरेखा गावडे, कमली तलांडी, विमल पुंगाटी, सुरेंद्र मडावी, राजू हिचामी उपस्थित होते.
मुख्याध्यापकाची बदली करा
येमली जि. प. शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी करण्यासंदर्भात पंचायत समितीला दोनदा तक्रारी देण्यात आला. परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई होऊन त्यांची बदली होत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आता प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा आहे.