Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:30 AM2019-04-14T00:30:29+5:302019-04-14T00:32:00+5:30

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे.

Lok Sabha Election 2019; Bushhinya is being speculated about the rigging of votes | Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज

Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत सर्वत्र खल : आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे. आमचाच उमेदवार १०० टक्के विजयी होणार, असा दावा आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना व काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विजयश्री खेचून आणण्यासाठी युती व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ११ ते १२ दिवस जीवाचे रान करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. कमकुवत भागात अधिक बैठका घेऊन गठ्ठामते आपल्या पदारात पाडून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र मतदार राजाची मेहरबानी कोणत्या उमेदवारावर होणार आहे. हे २३ मे च्या निकालानंतरच कळणार आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसकडून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, बसपाकडून हरिश्चंद्र मंगाम, एपीआयकडून देवराव नन्नावरे व वंचित आघाडीतर्फे डॉ. रमेशकुमार गजबे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. या पाचपैकी काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होती. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. स्थानिक स्तरासह राज्य व राष्टÑीय पातळीवरील पॉझिटीव्ह व निगेटीव्ह मुद्दे कार्यकर्त्यांनी मतदारांना पटवून दिले. शेवटी मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सर्वच स्रोतांकडून घेतली जात आहे माहिती
युती व आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागात सक्रीय आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाच्या वतीने प्रतिनिधीही ठेवण्यात आले. शिवाय गावपाटील व काही खास कार्यकर्त्यांकडे निरिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह शहरी भागातील पदाधिकारी तसेच गुप्त विभाग, राजकीय विश्लेषक व इतर स्त्रोतांकडून मतांची माहिती घेतली जात आहे. इतर तीन पक्षाच्या उमेदवारांच्या मताचा कोणावर कसा फरक पडेल, याबाबत चर्चेत मंथन केले जात आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Bushhinya is being speculated about the rigging of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.