Lok Sabha Election 2019; धानोरा तालुक्यात झाले ७२.३४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:11 AM2019-04-18T00:11:59+5:302019-04-18T00:13:50+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे.

Lok Sabha Election 2019; Dhanora taluka recorded 72.34 percent voting | Lok Sabha Election 2019; धानोरा तालुक्यात झाले ७२.३४ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; धानोरा तालुक्यात झाले ७२.३४ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : प्रशासनाने सांभाळली कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे.
भामरागड तालुका नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्याने या तालुक्यात मतदानाची प्रक्रिया राबविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. मोबाईलचे कव्हरेज नाही. त्यातच नक्षल्यांची दशहत आहे. या सर्व अडचणींवर मात करीत पोलीस व निवडणूक प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. मतदानाचे पथक चोख सुरक्षा बंदोबस्तात नेण्यात आले. त्याचबरोबर मतदान केंद्रावरही पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता.
तालुक्यात एकूण सहा बेस कॅम्प व ५२ मतदान केंद्र होते. पाच संवेदनशील मतदान केंद्र जवळच्या केंद्राशी जोडण्यात आले होते. मुस्का, मुरूमगाव हे जिल्हा परिषद क्षेत्र कुरखेडा तालुक्याशी जोडले होते. या ठिकाणी एकूण २२ मतदान केंद्र होते. तालुक्यात एकूण २० हजार ३५२ पुरूष व २० हजार ६७४ महिला असे एकूण ४१ हजार २६ मतदार आहेत. त्यापैकी १४ हजार ३६६ पुरूष व १५ हजार ३११ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुस्का मुरूमगाव जिल्हा परिषद क्षेत्र वगळता तालुक्यात एकूण ७२.६४ टक्के मतदान झाले. पाच झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरही चांगले मतदान झाले. धानोरा शहरात चार बुथ होते. त्यापैकी बुथ क्रमांक ५३ वर १ हजार ९७ पैकी ७५४ मतदारांनी मतदान केले. बुथ क्रमांक ५४ वर १ हजार ३० पैकी ६४९, बुथ क्रमांक ५५ वर ७०० पैकी ४३०, बुथ क्रमांक ५६ वर १ हजार ३०४ पैकी ७९२, रांगी येथील बुथ क्रमांक ४२ वर १ हजार १२४ पैकी ८३२ व बुथ क्रमांक ४४ वर ९३२ पैकी ७२२ मतदारांनी मतदान केले.
हेलिकॉप्टरने वाहतूक
नक्षलग्रस्त भागातील मतदान पथकांना हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आले. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच मतदान केंद्राच्या सभोवतालही पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे मतदान वाढले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Dhanora taluka recorded 72.34 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.