Lok Sabha Election 2019; निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:12 AM2019-04-08T00:12:53+5:302019-04-08T00:14:27+5:30

निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.

Lok Sabha Election 2019; Election Observers review preparedness | Lok Sabha Election 2019; निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा

Lok Sabha Election 2019; निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना सूचना : गडचिरोलीतील मतदान केंद्राची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथील काही मतदान केंद्रांची पाहणी करून संबंधिताना आवश्यक सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांनाही निवडणूक निरिक्षक डॉ.सेल्वराजयांनी यांनी भेट देऊन पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेतील आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्ष, मतदान केंद्र, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम, मतदार व मतदान जागृती कार्यक्रम, वाहन व्यवस्था, कायदाआणि सुव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन्सची उपलब्धता, मतमोजणी केंद्र व प्रक्रिया यासंदर्भातील कामकाजाचा तसेच मतदानाची टक्केवारी याबाबतही आढावा घेतला.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, निवडणूकीशी संदर्भित विविध कायदे व अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी तसेच निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देशही यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर असून प्रत्येक खर्चाचा तपशील कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहीत नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तर असा खर्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल, अशा सूचना निवडणूक निरिक्षक डॉ.सेल्वराज यांनी उपस्थितांना दिल्या.
प्रसार माध्यमांवर लक्ष
उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल. पेड न्यूजसंदर्भात इलेक्ट्रॉनिक तसेच मुद्रित माध्यमे, स्थानिक केबल नेटवर्क तसेच फेसबुक, टिष्ट्वटर, बल्क एसएमएस यासारख्या माध्यमांवरही विशेष लक्ष दिले जात असल्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Election Observers review preparedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.