Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार आज थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:45 PM2019-04-08T23:45:56+5:302019-04-08T23:46:33+5:30

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांपर्यंत मतदार पावत्या आणि मतदानासाठी आवश्यक असलेल्या १२ पैकी कोणत्याही एका ओळखपत्राबाबतची यादी असलेले पोस्टकार्ड पोहोचविणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Lok Sabha Election 2019; The publicity will be stopped today | Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार आज थंडावणार

Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार आज थंडावणार

Next
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सज्ज : सर्व मतदारांना घरपोच स्लिप, पोस्टकार्डमधून दिली कागदपत्रांची यादी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांपर्यंत मतदार पावत्या आणि मतदानासाठी आवश्यक असलेल्या १२ पैकी कोणत्याही एका ओळखपत्राबाबतची यादी असलेले पोस्टकार्ड पोहोचविणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हाभरात मतदार जागृती करणे सुरू आहे. ९६ कॉलेजच्या विद्यार्थ्यामार्फत मतदारांच्या घरी जाऊन जनजागृती केली जात आहे. यासोबतच जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा, बाइक रॅलीचेही आयोजन केले होते.

११ एप्रिलला सार्वजनिक सुटी
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ११ एप्रिल रोजी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळून) कारखाने, निवासी हॉटेल्स, मॉल्स, दुकाने किंवा इतर आस्थापनांना सार्वजनिक सुटी राहणार आहे. ही आस्थापने सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवावीत. तसेच त्या दिवशी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये असेही शासनाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण सुटी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी बस व्यवस्था
जिल्ह्यातील भामरागड, मुलचेरा, आष्टी, असरअली, सिरोंचा, कसनसूर व एटापल्ली या तालुका किंवा मुख्य केंद्र ठिकाणावरून येणाºया मतदान कर्मचाऱ्यांना ९ एप्रिल रोजी अहेरीपर्यंत येण्यासाठी १२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सर्व संबंधित कर्मचाºयांनी निर्देशित वेळी उपस्थित रहावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले.

जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात ७ लाख ५० हजार मतदारांना मतदार पावती (व्होटर स्लिप) वितरित करण्याचे काम कर्मचाºयांकडून सुरू आहे. त्या पावतीवर मतदारांचा फोटोही आहे. मतदानाच्या वेळी त्या पावतीसोबत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणने आवशयक आहे. त्याबाबतची माहिती पोस्ट कार्डच्या माध्यमातून मतदारांना दिली जात आहे.
हे पोस्ट कार्ड मराठीसोबतच बंगाली, माडिया आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये छापण्यात आले आहेत. मुलचेरा आणि चामोर्शी तालुक्यातील मतदारांसाठी बंगाली भाषेतील कार्ड तर एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि धानोरा तालुक्यातील माडियाबहुल क्षेत्रातील मतदारांना माडिया भाषेतील कार्ड दिले जात आहे. सिरोंचा तालुका आणि परिसरातील मतदारांना मराठी आणि तेलगू भाषेतील कार्ड वितरित केले जात आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; The publicity will be stopped today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.