Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:43 PM2019-04-08T23:43:29+5:302019-04-08T23:44:07+5:30

लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.

Lok Sabha Election 2019; Rural voters say, good days during Congress times | Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

Next
ठळक मुद्देउसेंडींना ग्रामसस्थांची साथ मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.
जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांच्या भागात शेतकरी कामगार पक्षासोबत काँग्रेस विचारसरणीचे लोक जास्त आहेत. काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले प्राबल्य असलेल्या भागात काँग्रेससाठी जोर लावला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी गावागावात संघटन वाढवून आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीचे ुउमेदवार डॉ.उसेंडी यांना होणार आहे.
विशेष म्हणजे ग्रामसभांच्या क्षेत्रातही शेकापचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यात हे नेते बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अद्याप कोणत्याही पक्षाचे नेते पोहोचले नाही. नक्षलवाद्यांची दहशत हे त्यामागील एक कारण आहे. परंतू आधीपासून दुर्गम भागातही संपर्क ठेवून असणाºया पक्षांचा प्रभाव तेथील नागरिकांवर कायम आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील नागरिक काँग्रेस आघाडीच्या बाजुने राहिल्यास डॉ.उसेंडी यांना लाभ होईल.

Web Title: Lok Sabha Election 2019; Rural voters say, good days during Congress times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.