Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:19 AM2019-04-13T00:19:17+5:302019-04-13T00:23:22+5:30

नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.

Lok Sabha Election 2019; On the second day, some polling parties base camps | Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

Next
ठळक मुद्देहेलिकॉप्टर पोहोचले नाही : पोलीस मदत केंद्रात ठोकावा लागला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.
पोलिंग पार्ट्यांना वाहनाने पोहोचविण्याचा धोका लक्षात घेऊन निवडणूक विभागाने त्यांना हेलिकॉप्टरने पोहोचविले होते. या कामासाठी चार हेलिकॉप्टर वापरण्यात आले. पोलीस मदत केंद्राच्या ठिकाणी बेस कॅम्प होते. या मदत केंद्राच्या परिसरातच हेलिपॅड तयार करण्यात आले होते. देसाईगंज, गडचिरोली व अहेरी येथून कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविले जात होते. तेथून मतदान केंद्राच्या गावापर्यंत पोलिंग पार्टीला पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांचा दुपारी ३ वाजताच गाशा गुंडाळण्यात आला. त्यानंतर संबंधित पोलिंग पार्टीला सायंकाळ होण्याच्या आधी बेस कॅम्पपर्यंत पोहोचविण्यात आले.
दुसºया दिवशी सकाळी आपण हेलिकॉप्टरने देसाईगंज किंवा अहेरी येथे पोहोचू, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी होती. मात्र हेलिकॉप्टर न आल्याने काही पोलिंग पार्ट्यांना बेस कॅम्पवरील पोलीस मदत केंद्रात थांबावे लागले. सावरगाव, गॅरापत्ती येथील पोलिंग पार्ट्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेस कॅम्पवरच थांबल्या होत्या. त्यामुळे ते कर्मचारी शनिवारी सकाळी पोहोचतील, अशी शक्यता आहे. ज्या पोलीस मदत केंद्रांवर कर्मचारी थांबले होते त्यांची पूर्ण व्यवस्था पोलिसांच्या मार्फत करण्यात आली होती, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वादळ वाºयासह पाऊस झाला. यावेळी बहुतांश कर्मचारी तालुकास्तरावर पोहोचले होते. मात्र वादळ वाऱ्याचा त्रास या कर्मचाºयांना सहन करावा लागला. काही कर्मचाऱ्यांना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे १२ वाजले.

आगाऊ फिरविण्यामुळे कर्मचारी त्रस्त
नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. मात्र गाव जवळच असताना त्यांना फेरा मारून संबंधित मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. फेरा मारून नेण्यामागे पोलिसांच्या सुरक्षेच्या रणनितीचा भाग असला तरी १० ते १५ किमीपर्यंत चालून पोलिंग पार्टीतील कर्मचारी व अधिकारी थकले होते. अहेरी तालुक्यातील मरपल्ली हे गाव अहेरीपासून जवळ आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना बसने सर्वप्रथम सिरोंचा येथे नेण्यात आले. त्यानंतर परत मरपल्ली येथे सोडण्यात आले. अनेक कर्मचारी ४० पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांना चांगलाच त्रास झाला.

Web Title: Lok Sabha Election 2019; On the second day, some polling parties base camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.