Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:28 AM2019-04-12T00:28:28+5:302019-04-12T00:29:37+5:30

शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगरमेंढा गावातील रहिवासी आहेत.

Lok Sabha Election 2019; Seven serious after the tractor reversed and killed four voters | Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर

Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर

Next
ठळक मुद्देडोंगरमेंढातील नागरिक : मतदान टाकून येत होते परत, उमेदवारांसह आमदारांची धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगरमेंढा गावातील रहिवासी आहेत.
हिराबाई मणिराम राऊत (७०), यमुना मुरारी मलगाम (७०), मिराबाई ईश्वर मरस्कोल्हे (५०) या तिघी जागेवरच ठार झाल्या तर कृष्णा मंसाराम कुळमेथे हे नागपूरला नेत असताना मृत्यू पावले. देवराव गोविंदा डोंगरवार (६०), सिध्दार्थ आत्माराम वैद्य (४५), दादाजी रामा मेश्राम (६५), वासुदेव मेश्राम (६०), बुधाजी कुळमेथे (३५), शांताबाई सदाशिव वलके (६५), माया दीपक ठाकरे (३५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. यातील तिघे नागपूर येथे तर चार जण गडचिरोली येथे भरती आहेत. इतर जवळपास १४ किरकोळ जखमींवर देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंगरमेंढा गावाचे मतदान केंद्र शंकरपूर येथे होते. मतदान करण्यासाठी जवळपास ३५ महिला व पुरूष मतदार हे शंकरपूर येथे विनोद बुध्दे यांच्या ट्रॅक्टरने गेले होते. परत येताना चालक रामा ठाकरे मद्यधुंद अवस्थेत होता. त्यात डोंगरमेंढा गावापासून एक किमी अंतरावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटली. यामध्ये ज्या महिला व पुरूष ट्रॅक्टरखाली दबल्या गेले.
अपघाताची माहिती मिळताच खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे उपसभापती गोपाल उईके यांनी रूग्णांची भेट घेतली. आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.
 

Web Title: Lok Sabha Election 2019; Seven serious after the tractor reversed and killed four voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.