लोकमतचे महेंद्र चचाणे पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: June 29, 2016 01:25 AM2016-06-29T01:25:19+5:302016-06-29T01:25:19+5:30

सन २०१३-१४ चा महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या प्रसिध्दीसाठी दिला जाणारा

Lokmat's Mahendra Chanchane is honored with the award | लोकमतचे महेंद्र चचाणे पुरस्काराने सन्मानित

लोकमतचे महेंद्र चचाणे पुरस्काराने सन्मानित

Next

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव : २०१३-१४ चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
गडचिरोली : सन २०१३-१४ चा महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या प्रसिध्दीसाठी दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार लोकमतचे देसाईगंज येथील वार्ताहर महेंद्र चचाणे यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते महेंद्र चचाणे यांना रोख २५ हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले. तर विदर्भस्तरावरचा तृतीय पुरस्कार देऊन आरमोरीचे पत्रकार रूपेश गजपुरे व जिल्हा स्तरीय द्वितीय पुरस्कार देऊन देसाईगंजचे ज्येष्ठ पत्रकार प्रभातकुमार दुबे यांना सन्मानित करण्यात आले. महेंद्र चचाणे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये होत असलेल्या कार्यक्रमांना व्यापक प्रसिध्दी दिली होती. त्याकरिता त्यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Lokmat's Mahendra Chanchane is honored with the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.