‘लोकमत’चे सामाजिक योगदान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:08 AM2017-11-16T01:08:15+5:302017-11-16T01:09:33+5:30

एखादे वृत्तपत्र केवळ व्यवसाय म्हणून बातम्या देण्याचे काम करताना पाहीले आहे. पण सखी मंच किंवा बालविकास मंचसारख्या व्यासपिठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कामात योगदान....

Lokmat's social contribution is big | ‘लोकमत’चे सामाजिक योगदान मोठे

‘लोकमत’चे सामाजिक योगदान मोठे

Next
ठळक मुद्देजर्मनीच्या युवक-युवतींनी केले महिला सक्षमीकरणाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एखादे वृत्तपत्र केवळ व्यवसाय म्हणून बातम्या देण्याचे काम करताना पाहीले आहे. पण सखी मंच किंवा बालविकास मंचसारख्या व्यासपिठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कामात योगदान देताना येथे ‘लोकमत’च्या रुपात पहिल्यांदाच पहायला मिळाले, असे कौतुकाचे बोल जर्मनीचे रहिवासी असलेल्या आयके आणि लिओनी या युवक-युवतींनी व्यक्त केले.
इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेलफेअर या संस्थेकडून युथ एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत हे दोघे भारतात आले आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ते गडचिरोलीत राहून येथील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करीत आहेत. यादरम्यान बुधवारी यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन आणि लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांनी त्यांचे स्वागत करून वृत्तपत्राची कार्यपद्धती सांगितली. तसेच लोकमत सखी व बालविकास मंचच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लिओनी व आयके यांनी जर्मनीत असे सामाजिक उपक्रम राबविणारे कोणतेही वृत्तपत्र आमच्या पाहण्यात नसल्याचे सांगितले. जर्मनीत राजकीय क्षेत्रात कोणतेही आरक्षण नसले तरी राजकीय पक्षांमध्येच ३० ते ५० टक्क्यांपर्यंत महिलांची संख्या असून युवा वर्गाचा राजकारणाकडे कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीत महिला सुरक्षित आहेत. भारतातील अनुभव चांगला असल्याचे लिओनी म्हणाली. यावेळी सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, संपादकीय सहकारी दिलीप दहेलकर, गोपाल लाजुरकर व इतर कर्मचारीही उपस्थित होते.

Web Title: Lokmat's social contribution is big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.