वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे बघा - पानिनी तेलंग

By Admin | Published: January 6, 2016 01:54 AM2016-01-06T01:54:12+5:302016-01-06T01:54:12+5:30

सध्याचे विद्यार्थी पुस्तकात दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून अभ्यास करतात. पुस्तकात दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विश्वास न ठेवता, ....

Look at the world from a scientific perspective - Panini Telang | वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे बघा - पानिनी तेलंग

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे बघा - पानिनी तेलंग

googlenewsNext

विद्यार्थ्यांशी थेट साधला संवाद
गडचिरोली : सध्याचे विद्यार्थी पुस्तकात दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून अभ्यास करतात. पुस्तकात दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विश्वास न ठेवता, ती माहिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे बघून विज्ञान समजून घेण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे प्रतिपादन राजेंद्रसिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी नागपूरचे संचालक पानिनी तेलंग यांनी केले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्ताने जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल येथे मंगळवारी आयोजित व्याख्यानात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना पानिनी तेलंग म्हणाले, जे विद्यार्थी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. त्यांना विज्ञानाची दिशा मिळते व त्यांनाच विज्ञान शिकण्याचा आनंद मिळते. आपण जे शिकतो ते आपल्याला समोरच्या व्यक्तींना सांगता आले पाहिजे. यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे अनेक प्रश्न सुटतील, असा विश्वासही तेलंग यांनी व्यक्त केला. व्याख्यानादरम्यान उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तेलंग यांना प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून यावेळी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

प्रश्न, उदाहरणातून उलघडले विज्ञानातील सत्य
पृथ्वीचा आकार गोलाकार आहे. हे सिध्द कसे कराल, क्लोरीन या मूलद्रव्याला क्लोरीन नाव का पडले, लोखंडाला गंज का लागतो, मेंदूला गंज लागतो का, पाण्यात हात घातल्यानंतर हाताला सुरकुत्या का पडतात, पोळी शिजविताना ती का फुगते आदी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून तसेच विज्ञानातील अनेक उदाहरण देऊन व त्याचे स्पष्टीकरण करून पानीनी तेलंग यांनी विद्यार्थ्यांपुढे विज्ञानातील सत्य यावेळी उलघडून दाखविले.

Web Title: Look at the world from a scientific perspective - Panini Telang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.