जनावरे विक्रीत पशुपालकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:41+5:30
पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या दलालाचे कनेक्शन अड्याळ व नागपूर येथील मोठ्या कसायाशी असल्याची चर्चा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णत: कोलमडली आहे. दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील पशुपालकांच्या भाकड व देशी गायींवर कसायांची नजर आहे. पशुपालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कसाई अत्यल्प किमतीत भाकड व देशी गायीची खरेदी करीत आहेत. परिणामी या व्यवहारात पशुपालकांची आर्थिक लूट होत आहे.
पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या दलालाचे कनेक्शन अड्याळ व नागपूर येथील मोठ्या कसायाशी असल्याची चर्चा सुरू आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात गायीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला चांगला उत आला आहे. अत्यल्प किमतीत शेतकऱ्यांकडून भाकड व देशी गायी खरेदी करून ही जनावरे मोठ्या कसायापर्यंत वाहनांद्वारे पोहोचविले जात आहेत.
पूर्वी शेतीच्या कामात पाळीव जनावरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आता गाय, बैैल, म्हैैस व इतर पाळीव जनावरे जंगलात नेऊन चारण्यासाठी गुराखी मिळत नाही. परिणामी त्यांच्या देखभाल व पोषणाची जबाबदारी सांभाळणे शेतकºयांना कठिण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्याकडील पाळीव जनावरे व्यापाºयांना विकत आहेत.
कुपोषित, हाळकुडे जनावरे कसायांना अल्प किमतीत विकून पशुपालक तणावमुक्त होत आहेत. अनेक शेतकरी ट्रॅक्टर व इतर यंत्राचा वापर करून विकसीत शेती करीत आहेत. परिणामी गेल्या तीन- चार वर्षात उत्तर भागासह गडचिरोली जिल्ह्यात पशुधन घटले आहे.
दलालांचे पोलिसांशी साटेलोटे?
गेल्या दोन वर्षांपासून देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून पाळीव जनावरे कसाई वाहनामध्ये भरून मोठ्या प्रमाणात नेत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात वाहनांची तपासणी केली जात असल्याने हा प्रकार अत्यंत कमी झाला आहे. मात्र त्यापूर्वी कत्तलीसाठी अनेक जनावरे नेण्यात आली. यात दलालांचे पोलिसांशी साटेलोटे असल्याची चर्चा आहे.