रानडुकरांकडून धानाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:14 AM2018-09-03T01:14:51+5:302018-09-03T01:21:23+5:30

धानपीक लोंबीवर आल्यानंतर रानडुकरांकडून धान पिकाची नासाडी झाली, अशी शेतकऱ्यांची ओरड असायची. परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर १०-१५ दिवसांत रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे वैरागड, करपडा येथील अनेक शेतकºयांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे.

Loss of charity by randukars | रानडुकरांकडून धानाची नासाडी

रानडुकरांकडून धानाची नासाडी

Next
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : माकडांच्या हैदोसामुळे वैरागडातील परसबागा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : धानपीक लोंबीवर आल्यानंतर रानडुकरांकडून धान पिकाची नासाडी झाली, अशी शेतकऱ्यांची ओरड असायची. परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर १०-१५ दिवसांत रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे वैरागड, करपडा येथील अनेक शेतकºयांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे.
वन विभागाच्या जाचक अटीमुळे रानडुकरांच्या शिकारीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आले आहे. त्यामुळे रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढून पिकांच्या नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. रानडुकरांकडून धान पिकाची हानी होत असेल तर संबंधित शेतकºयाला वन विभागाने आखून दिलेल्या अटी, शर्तीनुसार रानडुकरांची शिकार करता येते. रानडुकरांमुळे शेतकºयांचे खरोखरच नुकसान झाले आहे काय, शिकार केल्यानंतर मोका पंचनामा आणि पंचासमक्ष रानडुकराला जमिनीत पुरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या अडचणीच्या प्रक्रियेत शेतकरी पडत नाही. त्यामुळे रानडुकराकडून होणाºया पिकाच्या हानीचे प्रमाण वाढले आहे. वैरागड गावालगत असलेल्या किल्ल्यातील झुडूपात, हिरापूर, करपडा, चामोर्शी माल, रयतवारीलगतच्या शेतांमध्ये रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर हैदोस आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वैरागड येथील परसबागांमध्ये अनेक नागरिकांनी भाजीपाला फळझाडे लावली आहेत. परंतु माकडांकडून भाजीपाल्याचे नुकसान केले जातात. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरवर्षीच माकडांच्या हैदोसाचा नागरिकांना सामना करावा लागतो. परंतु माकडांचा बंदोबस्त वन विभागाच्या कर्मचाºयांकडून केला जात नाही. परिणामी दिवसेंदिवस हैदोस वाढत आहे. तसेच वैरागड परिसरात डुकरांची संख्या वाढल्याने पिकाचेही नुकसान होत आहे

रानडुकरांमुळे धान पिकाची नासाडी झाली असल्यास शेतकºयांनी फोटोसह वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी जमिनीच्या सातबाºयासह अर्ज करावा. त्यानंतर क्षेत्र सहायक, कृषी सहायक, वनरक्षक यांनी मोका चौकशी करून झालेल्या हानीचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविल्यानंतर तो मंजूर झाल्यास शेतकºयांना आर्थिक मदत वन विभागाकडून दिली जाते.
- व्ही. टी. शिवणकर,
वनरक्षक, वैरागड

Web Title: Loss of charity by randukars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.