अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:12 AM2018-09-12T00:12:44+5:302018-09-12T00:13:35+5:30

पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.

A lot of thieves in thieves | अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देवैरागड, नागेपल्ली, आलापल्ली येथे चोरी : सुमारे चार लाख रूपयांचा ऐवज लंपास, सुट्यांमध्ये साधली संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.
आलापल्ली : गोंड मोहल्ला येथील निवासी प्रदीप शामराव घुटे यांच्या घरी अज्ञात इसमांनी घरफोडी करून दोन चांदीच्या मुर्त्या, तीन ड्रेस, तीन टॉवेल, लॅपटॉप असा ऐवज ९ सप्टेंबरच्या रात्री चोरून नेला. नागेपल्ली आंबेडकर वार्डात चोरांनी एकाच रात्री तीन घरे फोडली. यामध्ये पुष्पा भडके यांच्या घरातील आलमारी फोडून पाच ग्रॅम अंगठी, पाच हजार रूपये व मोबाईल, टॅब असा एकूण २० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. देवराव अलाम यांच्या घरातील आलमारी फोडून सहा हजार रूपयांची रोकड लंपास केली. विवेक घुमे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फुटला नाही. तेथून चोरटे पसार झाले. यामुळे आंबेडकर वार्डात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांच्या घरी चोरी झाली ते सर्व परगावी गेले होते. गावावरून परत आल्यानंतर घटना उघडकीस आली. परिचारिका तलांडे यांच्या घराचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न झाला. आलापल्ली व नागेपल्ली ही दोन्ही गावे अगदी जवळ आहेत. दोन्ही गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वैरागड : वैरागड येथे मंगळवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे तीन हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरा वार्डात मध्यरात्रीच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या नलिनी सदाशिव ठाकरे महिलेच्या घराचा दरवाजा तोडून तिच्या घरातील दोन लाख रूपये रोख व सोने असा एकूण २ लाख ५० हजार रूपयांच ऐवज लंपास केला आहे. याच वार्डातील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रमोद तावेडे यांच्या किराणा दुकानाचे दार तोडून दुकानात असलेले दोन हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याच बरोबर शिक्षक कॉलनीतील अजय नागमोती यांच्या घराचे दार तोडून रोकड व सोने असा एकूण ३६ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक राठोड घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकही आणण्यात आले होते. मात्र काहीच फायदा झाला नाही. चोरीतील बहुतांश गुन्हेगार पकडले जात नाही. त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढत चालली आहे. चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: A lot of thieves in thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर