प्रेमीयुगुल दोन जोडपी अडकली विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:19 PM2017-09-16T23:19:50+5:302017-09-16T23:20:05+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

Love couple get married in stunted marriage | प्रेमीयुगुल दोन जोडपी अडकली विवाहबंधनात

प्रेमीयुगुल दोन जोडपी अडकली विवाहबंधनात

Next
ठळक मुद्देगेवर्धा व भेंडाळा येथे सोहळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/चामोर्शी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. विजय श्रीराम दर्रो रा. सिंदेसूर ता. कुरखेडा व ज्याती रोहित कल्लो रा. बामणी ता. कुरखेडा असे विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलांचे नाव आहे. मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेम बहरले होते. परंतु त्यांच्या विवाहाला आईवडिलांचा विरोध होता. अखेर दोघांनीही गेवर्धा गाठून तंमुसकडे विवाह करून देण्याची मागणी केली. समितीने दोघांच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर हिंदू विवाह पद्धतीने सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी तंमुस अध्यक्ष कानचंद सयाम, सरपंच टिकाराम कोरेटी, उपसरपंच संदीप नखाते, ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, माजी उपसभापती बबन बुद्धे, तंमुस सदस्य अनिराम बोगा, भोला पठाण, विजय ढवळे, यादव नाकतोडे, डाकराम मैंद, कंगाली, डॉ. नासिर खान, कृष्णा मस्के, रहिम पठाण, अविनाश भनारे, दिनेश कावळे, आनंद भनाईत, महादेव मडावी, तेजराम बुद्धे व नागरिक हजर होते.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने १५ सप्टेंबरला प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा पार पडला. धनराज मंगलदास रेचनकर (२४) व अंजू भीमराव बंडावार रा. फोकुर्डी अशी विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. दोघांच्या विवाह सोहळ्याला घरच्या कुटुंबातील व्यक्तींचा विरोध होता. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी भेंडाळा गाठून तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करून विवाह लावून देण्याची विनंती केली. समितीने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून दोघांचाही विवाह ग्रामपंचायत भवनात पार पाडला. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे निमंत्रक पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, सरपंच नंदा मोगरे, सचिव कसारलावार, तंमुस अध्यक्ष गुरूदेव डांगे, माजी पं. स. सदस्य प्रमोद भगत, प्रमोद गोर्लावार, संजय चलाख, चरणदास चलाख, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नोमाजी सातपुते, उपाध्यक्ष साईनाथ चलाख, मंगलदास रेचनकर, भय्याजी तुंबडे, मनोहर तुंबडे, गजानन पोरेड्डीवार, वनीता पोरेड्डीवार, आशा डांगे, तंटामुक्त समितीचे तसेच ग्रा. पं. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Love couple get married in stunted marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.