आलापल्लीच्या तलावाचे खाेलीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:51+5:302021-01-20T04:35:51+5:30
आलापल्ली : आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताल अतिक्रमणाचा विळखा आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी या तलावाला वेढा घातला आहे. दुर्लक्षितपणामुळे, देखभालीअभावी ...
आलापल्ली : आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताल अतिक्रमणाचा विळखा आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी या तलावाला वेढा घातला आहे.
दुर्लक्षितपणामुळे, देखभालीअभावी या तलावाचे रूपांतर आता बोडीत झाले आहे. येथील भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या एकमेव मामा तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खोलीकरणाअभावी या तलावात अधिक प्रमाणात पाण्याची साठवणूक होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून खोलीकरण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून याबाबत मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
बाॅक्स ....
जलपातळी घटली
अनेक गावांतील माजी मालगुजारी तलावात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने तलावाचे पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे जलपातळी घटली आहे. याशिवाय काही तलावांतील खाेलीकरणाचे काम अनेक वर्षांपासून न झाल्याने तलावाचे खाेलीकरण करण्याची गरज आहे.