जिल्हा विकासात मडावी यांचे भरीव याेगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:25+5:302021-06-17T04:25:25+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त कै.बाबुराव मडावी चौक धानोरा रोड, गडचिरोली येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार ...
गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त कै.बाबुराव मडावी चौक धानोरा रोड, गडचिरोली येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला जि.प. समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, देसाईगंज नागरी बँकेचे अध्यक्ष, आदिवासी सेवक घनश्याम मडावी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, नगरसेवक गुलाब मडावी, रंजना गेडाम, वर्षा सेडमाके, सदानंद ताराम, आनंद कंगाले, कुसुम अलाम, प्रदीप कुरसंगे, राजीव मसराम, सुखदेव वेटे, रुषी होळी, डंबाजी पेंदाम, ऋषी कुडमेथे, निवास कोडापे, नितेश मडावी, सुधीर मसराम, देवराव अलाम, विनायक कोडापे, राजेश्वर पदा, रोहिणी मसराम, देवराव अलाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमरसिंह गेडाम तर आभार विनायक कोडापे यांनी मानले.
बाॅक्स
स्मारक समिती स्थापन करणार
गडचिरोली येथे कै. बाबुरावजी मडावी स्मारक समिती स्थापन करून आदिवासी समाजातील थोर नेत्यांचे पुतळे उभारण्याबाबतची कार्यवाही समितीमार्फत करण्यात येईल. यासाठी एक स्मारक मंच तयार करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच गडचिराेली येथे कै. बाबुरावजी मडावी यांचा पुतळा उभारण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
===Photopath===
160621\16gad_1_16062021_30.jpg
===Caption===
कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी समााजातील अधिकारी व पदाधिकारी.