‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:54 AM2018-02-28T00:54:38+5:302018-02-28T00:54:38+5:30

‘किमतीत स्वस्त व पाहण्यास मस्त’ असलेल्या चिनी वस्तूंचा रंगपंचमीच्या बाजारपेठेत बोलबाला राहत होता.

 'Made in India' decorated market by the market | ‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ

‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ

Next
ठळक मुद्देआली रंगपंचमी : चिनी वस्तुंची मक्तेदारी येतेय संपुष्टात, मोदी मुखवटे व पिचकाऱ्याही उपलब्ध

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ‘किमतीत स्वस्त व पाहण्यास मस्त’ असलेल्या चिनी वस्तूंचा रंगपंचमीच्या बाजारपेठेत बोलबाला राहत होता. मात्र यावर्षी पहिल्यांदाच चिनी वस्तूंऐवजी भारतामध्ये बनलेल्या वस्तू रंगपंचमीच्या बाजारपेठेत बघायला मिळत आहेत. यावरून खेळण्यांच्या बाजारपेठेत आजपर्यंत असलेल्या चिनी कंपन्यांच्या मक्तेदारीला सुरूंग लागले असल्याचे दिसून येत आहे.
रंगपंचमीचा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग उधळण्यासाठी विविध प्रकारच्या बंदूक, मुखवटे, रंग यांची मागणी वाढते. सण जरी भारतातील असला तरी मागील १० वर्षांपासून या सर्व वस्तूंची निर्मिती चिनी कंपन्या करीत होत्या. चिनच्या वस्तू ‘किमतीने स्वस्त व पाहण्यास मस्त’ राहत असल्याने बालकांसह पालक सुध्दा याकडे आकर्षीत होत होते. त्यामुळे किरकोळ दुकानदार सुध्दा चिनी बनावटीच्या वस्तू ठेवण्यास प्राधान्य देत होते.
मात्र यावर्षी पहिल्यांदाच गडचिरोली येथील रंगपंचमीच्या बाजारपेठेमध्ये ९० टक्के वस्तू या भारतीय बनावटीच्या असल्याचे दिसून येते. चायनाच्या वस्तूंची नक्कल करीत भारतीय कंपन्यांनी तेवढ्याच किमतीत वस्तू निर्मिती केली आहे. त्यामुळे भारतीय बनावटीचे खेळणे चिनी वस्तूप्रमाणेच स्वस्त पडत आहेत. त्यामुळे ग्राहक चिनी वस्तूंच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
रंगपंचमीचा सण केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गडचिरोली येथील बाजारपेठ रंगपंचमीसाठी सज्ज झाली आहे. रंग उधळण्यासाठी लागणारे विविध वस्तू, विविध प्रकारचे रंग, मुखवटे यांनी बाजारपेठ सजली असून ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहे.
१० रूपयांपासून ३५० रूपयांच्या वस्तू
रंगपंचमीनिमित्त लागलेल्या दुकानांमध्ये अगदी १० रूपयांपासून ते ३५० रूपयांपर्यंतच्या वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये साध्या रंगाचा पॉकेट १० रूपये, पाण्यामध्ये टाकायचा रंग १० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत, हर्बल गुलाल ५५ रूपये, वॉटर बलून, एअर गण, वॉटर गण, मॉस्क, वॉटर टँक उपलब्ध आहेत.

Web Title:  'Made in India' decorated market by the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी