घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता माेजा 916 रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:00 AM2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:40+5:30
दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पेट्राेल व डिझेलप्रमाणेच गॅसच्या किमतीमध्येही सातत्याने वाढ हाेत आहे. १७ ऑगस्टला शासनाने १४.२ किलाे ग्रॅम वजनाच्या घरगुती सिलिंडरवर २५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता गडचिराेली जिल्ह्यात सिलिंडरची किंमत सुमारे ९१६ रुपयांवर पाेहाेचली आहे.
दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दाेन व्यक्तीच्या कुटुंबाला एक हजार रुपयांचा किराणा लागत नाही.
व्यावसायिक सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्त
घरगुती सिलिंडरची किंमत वाढवत असतानाच १९ किलाे वजनाचे व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे पूर्वी या सिलिंडरची किंमत १७६३ रुपये हाेती. आता ही १७५८ रुपये झाली आहे.
पाच किलाेंचे सिलिंडर ३ रुपयांनी वाढले
काही व्यावसायिक पाच किलाेचे सिलिंडरही वापरतात. याची किंमत पूर्वी ५३१ रुपये हाेती. १७ ऑगस्टपासून ती किंमत ५३४ रुपये झाली आहे.
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
- दाेन वर्षांपूर्वी शासनाकडून २०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात हाेती. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांचा सिलिंडर खरेदी केला तरी प्रत्यक्षात त्याला ताे सिलिंडर केवळ ३०० रुपयांना पडत हाेता. आता मात्र, सिलिंडरची सबसिडी केवळ ४० रुपयांवर आली आहे.
- सिलिंडरची किंमत वाढत असताना सबसिडी मात्र ३० रुपये कायम ठेवली आहे. अनेकांना ही सबसिडी सुद्धा जमा हाेत नाही.
शहरात चुली कशा पेटवायच्या
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कुटुंब पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करत आहेत. ग्रामीण भागात सरपण उपलब्ध हाेऊ शकते. मात्र, शहरात कुठून सरपण आणणार. त्यामुळे गॅसची किंमत कितीही वाढली तरी गॅसवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.
- मायाबाई शेंडे, गृहिणी
गॅस सिलिंडर हे अत्यावश्यक गरजेमध्ये माेडणारी वस्तू झाली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवर जास्त प्रमाणात सबसिडी देण्याची गरज आहे. एक हजार रुपयांचा सिलिंडर खरेदी केल्यानंतर महिन्याचा बजेट बिघडत चालला आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- कविता उसेंडी, गृहिणी