महा ई-सेवा केंद्र अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:23 AM2021-07-03T04:23:20+5:302021-07-03T04:23:20+5:30

अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० ...

Maha e-seva kendra atalp | महा ई-सेवा केंद्र अत्यल्प

महा ई-सेवा केंद्र अत्यल्प

Next

अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

बनावट बिलाचा वापर

गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते.

कठडे लावण्यास दिरंगाई

चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघातांची शक्यता आहे. या मार्गावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहेरीत वाहतूक कोंडी

अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

रुग्णवाहिकेची गरज

कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह परिसरातील नागरिक येतात.

पोलीस चौकी सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी.

Web Title: Maha e-seva kendra atalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.