महागाव घाटातून रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:35 PM2017-07-30T23:35:54+5:302017-07-30T23:36:19+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाºयांनी तालुक्यातील महागाव नदी घाटाच्या परिसरात सापळा रचून रेतीची अवैध तस्करी करणारे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाºयांनी तालुक्यातील महागाव नदी घाटाच्या परिसरात सापळा रचून रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रॅक्टर पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणातील ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरीचे क्षेत्र सहायक आर. आर. वासेकर, पी. एम. नंदगिरवार, जी. एल. नवघरे व व्ही. बी. आत्राम यांनी मिळालेल्या माहितीनुसार महागाव नदी घाटाकडे जाणाºया रस्त्याची तपासणी केली. त्यानंतर वांगेपल्ली घाटाकडेही तपासणी केली. रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर रेती घाटाकडे न जाता वांगेपल्ली गावात परत गेल्याचे दिसून आले. दरम्यान अहेरी मार्गाने ट्रॅक्टर येत असल्याचा अंदाज वन कर्मचाºयांना आला. वन विभागाच्या पथकांनी वांगेपल्लीवरून अहेरीकडे मोर्चा वळविला. दरम्यान महागाव घाटाकडे सदर वाहने गेल्याचे वन कर्मचाºयांना समजले. महागाव नदी पात्रातून चार ट्रॅक्टर वन कर्मचाºयांनी जप्त केले. यामध्ये तीन ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये रेती भरलेली होती व एक ट्रॅक्टर रिकामे आढळून आले. ए. आर. कुमरे, विकास लांजेवार व श्रीरामे या वनकर्मचाºयांनी वन परिक्षेत्र कार्यालयात या घटनेच पंचनामा केला. एमएच ३३ एफ ३८०१ क्रमांकाचे नोंदणी नसलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर ट्रॅक्टर अहेरी येथील सुरेश बासबोईनवार यांच्या मालकीचे आहे. लक्ष्मण डोंगरे रा. अहेरी यांच्या मालकीचे एमएच ३३ एफ २८४१ तसेच मोहम्मद रशीद रफीक शेख यांच्या मालकीचे नोंदणी नसलेले ट्रॅक्टरचा यात समावेश आहे. घटनास्थळावर चार मजूर व चार चालक तसेच तीन ट्रॅक्टर मालक व प्रभाकर डोंगरे उपस्थित होते. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले.