महाबीजचे धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:29+5:302021-06-19T04:24:29+5:30
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आरमोरी : खरीप २०२१ हंगामात प्रमाणित धान बियाण्यासाठी शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व ग्राम ...
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
आरमोरी : खरीप २०२१ हंगामात प्रमाणित धान बियाण्यासाठी शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महाबीजचे इतर प्रमाणित वाणासोबतच धान एमटीयु-१०१० या वाणाससुद्धा अनुदान आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान एमटीयु - १०१० या वाणास १००० रुपये प्रतिक्विंटल अनुदान असून, ग्राम बीजोत्पादन योजनेत १७५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान आहे. धान-एमटीयु-१०१० या वाणाची बॅग २५ किलोची असून, अनुदान वजा जाता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत ७०० रुपये व ग्राम बीजोत्पादन योजनेत ५६२.५० रुपये प्रतिबॅग प्रमाणे परमीटवर महाबीज विक्रेत्यामार्फत विक्री करण्यात येत आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बंधुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीज चंद्रपूरचे जिल्हा व्यवस्थापक अजय फुलझेले, तसेच आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी यांनी केले आहे.