महागाव खुर्द आठ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:30 AM2019-08-25T00:30:34+5:302019-08-25T00:31:40+5:30

पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत.

Mahagaon Khurd in the dark for eight days | महागाव खुर्द आठ दिवसांपासून अंधारात

महागाव खुर्द आठ दिवसांपासून अंधारात

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दुरूस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष; साप, विंचू चावण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : अहेरी तालुकास्थळापासून जवळच असलेल्या महागाव खुर्द येथील वीज ट्रान्सफार्मर जळाल्याने या गावाचा वीज पुरवठा मागील आठ दिवसांपासून खंडीत झाला आहे. नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे.
आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यामुळे महागाव खुर्द येथील ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन सदर ट्रान्सफार्मर जळाला. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीत झाला. ट्रान्सफार्मर जळाल्याची माहिती गावातील नागरिकांनी महावितरणला दिली आहे. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही ट्रान्सफार्मर दुरूस्ती करण्याविषयी महावितरणने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीतच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. ट्रान्सफार्मरची लवकर दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलनचा इशारा महागाव येथील सरपंच श्रीहरी आलाम, ग्रा.पं. सदस्य गणेश चौधरी, श्रीनिवास आलाम, तुकाराम नैताम यांनी दिला आहे.

खंडीत वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त
महागाव खुर्द परिसरातील जवळपास सर्वच गावांमध्ये वीज पोहोचली आहे. प्रत्येक घरामध्ये वीज जोडणी आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर चार ते पाच दिवस तो पूर्ववत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी सुध्दा राहत नाही.

Web Title: Mahagaon Khurd in the dark for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.